Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

OpenAI आता कॉम्प्युटरलाच रोबोटमध्ये बदलण्याची करतोय तयारी; टेस्टिंगही झाली सुरु

OpenAI आता कॉम्प्युटरलाच रोबोटमध्ये बदलण्याची करतोय तयारी; टेस्टिंगही झाली सुरु

नवी दिल्ली : सध्या OpenAI ने अलीकडेच त्यांचा पहिला एजंटिक एआय ब्राउझर ATLAS लाँच केला. त्यानंतर लगेचच, गुगलचे शेअर्स घसरले. गुगलला १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पण खरी गोष्ट फक्त ब्राउझरची नाही तर त्यापलीकडे जाते. ओपनएआय सध्या अस्तित्वात नसलेली बाजारपेठ काबीज करण्याची तयारी करत आहे.

एजंटिक एआय अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु सॅम ऑल्टमन यांनी महत्त्वपूर्ण भाकीत केले आहे. पुढील काही वर्षांत ही जागा काबीज करेल आणि गुगल पुन्हा मागे पडू शकते. जवळजवळ चार वर्षांपूर्वी जेव्हा चॅटजीपीटी लाँच केले गेले, तेव्हा ही कंपनी गुगलशी स्पर्धा कशी करेल आणि मोनोपॉली कशी मोडेल, याची माहिती होती. आता, कमी-अधिक प्रमाणात, ते घडताना दिसून आले. गुगल सर्चमध्ये सतत घट होत आहे आणि कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गुगलवरील लोकांची डिपेंडन्सी कमी होताना दिसत आहे.

ATLAS ब्राउझरमध्ये Google Chrome चे सर्व फीचर्स असणार आहेत. मात्र, त्याचा बिल्ट-इन असिस्टंट तुमच्या कमांडवर देखील आपोआप काम करतो. हा ब्राउझर नक्कीच Google Chrome शी स्पर्धा करेल, असे म्हटले जात आहे. ATLAS लाँचच्या दुसऱ्या दिवशी, OpenAI ने घोषणा केली की त्यांनी Apple Shortcut तयार करणाऱ्या टीमला विकत घेतले आहे. Apple चे प्रमुख ऑटोमेशन अॅप, Shortcut तयार करणाऱ्या टीमची मालकी आता OpenAI च्या मालकीची आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!