Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कामिनी कौशल यांनी बहिणीच्या पतीशी केलं होतं लग्न; धर्मेंद्र यांच्याशीही होतं विशेष नातं

कामिनी कौशल यांनी बहिणीच्या पतीशी केलं होतं लग्न; धर्मेंद्र यांच्याशीही होतं विशेष नातं

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आरोग्याविषयीची माहिती आता समोर येत आहे. आधी धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती. त्यांच्या निधनाच्या अफवाही अनेक ठिकाणी पसरल्या होत्या. असे असताना आता १९४० पासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे.

कामिनी कौशल यांनी जवळजवळ ७० वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. आजच्या पिढीने तिला शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस, शाहिद कपूरचा कबीर सिंग आणि आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा सारख्या चित्रपटांमध्ये पाहिले असेल. पण या चित्रपटांव्यतिरिक्त, त्या १९४० ते १९७० दरम्यान सर्वात जास्त चमकल्या. कामिनी कौशल यांनी बहिणीच्या पतीशी लग्न केलं होतं. या काळात, त्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या. अनेक मोठ्या स्टार्ससोबत पडद्यावर दिसल्या. त्या स्टार्सपैकी एक म्हणजे धर्मेंद्र, ज्यांच्यासोबत कामिनी कौशल काम करत होत्या. दोघांनी जवळपास चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाची नायिका कामिनी कौशलला भेटल्याचे सांगितले होते.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “माझ्या पहिल्या चित्रपट ‘शहीद’ची नायिका कामिनी कौशलसोबतच्या माझ्या पहिल्या भेटीचा पहिला फोटो…आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद… एक प्रेमळ ओळख.” कामिनी कौशलने १९४८ मध्ये दिलीप कुमार यांच्या ‘शहीद’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!