Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम! चौथ्या रविवारी बक्कळ कमाई, 68 कोटींचा टप्पा पार

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम! चौथ्या रविवारी बक्कळ कमाई, 68 कोटींचा टप्पा पार

Deool Band 2 : प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन जोशी यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘देऊळ बंद 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही मजबूत पकड ठेवून आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही प्रेक्षकांचा उत्साह कायम असून चौथ्या आठवड्यातही सिनेमाने उल्लेखनीय कमाई केली आहे.

चौथ्या रविवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशी ‘देऊळ बंद 2’ ने तब्बल 1.80 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी 1.40 कोटींचे कलेक्शन झाल्यानंतर रविवारी सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ नोंदवली गेली. रविवारी एकूण 864 शो पार पडले असून त्यातून ही कमाई झाली आहे.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, आतापर्यंत ‘देऊळ बंद 2’ ने भारतात 68.22 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. चौथ्या आठवड्यातही सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट 80 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत मोहन जोशी यांनी साकारलेला अभिनय आणि चित्रपटातील भावनिक व आध्यात्मिक मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद 2’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!