Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

U&i ने लाँच केले चार शक्तिशाली स्पीकर्स; 499 पासून किंमत होते सुरू

U&i ने लाँच केले चार शक्तिशाली स्पीकर्स; 499 पासून किंमत होते सुरू

नवी दिल्ली : सध्या टेक मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स उपलब्ध होत आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी U&i ने भारतीय बाजारात नवीन ब्लूटूथ स्पीकर्स लाँच केले आहेत. कंपनीने एंट्री-लेव्हल सेगमेंटपासून ते पार्टी स्पीकर्सपर्यंत विविध स्पीकर्स लाँच केले आहेत. कंपनीने UiBS २३६७ पार्टी स्पीकर लाँच केले आहे, जे ब्रँडचे प्रीमियम प्रॉडक्ट्स आहे. इतर तीन मॉडेल्स कॉम्पॅक्ट स्पीकर्स आहेत.

कंपनीने कॉम्पॅक्ट स्पीकर श्रेणीमध्ये UiBS-५१६६ इनसाइट सीरीज, UiBS-५१७५ एंट्री ६६ आणि UiBS-५१७५ इग्नाइट सीरीज लाँच केले आहे. हे स्पीकर्स पॉवर, पोर्टेबिलिटी आणि स्टाइलमध्ये चांगलेच हटके असे आहेत. कंपनीने UiBS २३६७ पार्टी स्पीकर लाँच केला आहे, जो लाऊड ​गाणे ऐकणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. हे १२०W साउंड आउटपुटसह ड्युअल ८-इंच स्पीकर्ससह मिळत आहे. यात TWS फीचरही देण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्हाला वायरलेस स्टीरिओ पेअरिंगचा आनंद घेता येतो. हे फीचर तुम्हाला साउंड आउटपुट वाढविण्यासाठी दोन स्पीकर्स एकमेकांशी जोडण्याची सुविधा मिळते.

या पार्टी स्पीकरमध्ये TF कार्ड, USB, Aux पोर्ट आणि FM रेडिओसह कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. कंपनीमध्ये दोन वायरलेस UHF मायक्रोफोन आणि रिमोट कंट्रोल देखील आहेत. कंपनीच्या मते, हे डिव्हाइस १० तासांच्या बॅटरी लाइफसह येते. स्पीकरमध्ये RGB LED लाईट्स आणि LED डिस्प्ले आहे. याची किंमतही परवडणारी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!