Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शुद्ध हवेसाठी वापरा एअर प्युरिफायर; फक्त 1500 रुपयांमध्ये मिळेल शुद्ध हवा अन् पोर्टेबलही…

शुद्ध हवेसाठी वापरा एअर प्युरिफायर; फक्त 1500 रुपयांमध्ये मिळेल शुद्ध हवा अन् पोर्टेबलही…

नवी दिल्ली : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हिवाळा सुरू होताच वातावरणातील वायू प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआर असो किंवा देशातील इतर कोणतेही शहर असो, सर्वत्र वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरलेले असते. त्यात दिवाळीत वाजवणाऱ्या फटक्यांमुळे तर वायू प्रदूषणात मोठी वाढ होते. त्यामुळे तुम्ही एअर प्युरिफायर वापरू शकता.

घरी असताना किंवा बस, ट्रेन किंवा मेट्रोने प्रवास करताना एअर प्युरिफायर तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकता. हे बॅटरीवर चालणारे एअर प्युरिफायर वापरण्यास खूप सोपे आहेत. एअर प्युरिफायर असंख्य ऑनलाईन आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. हे प्युरिफायर सहज उपलब्ध आहेत आणि खूप लहान आकारात येतात. या एअर प्युरिफायरला वेअरेबल एअर प्युरिफायर नेकलेस म्हणतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते ऑनलाईन पाहताना त्याची सुरुवातीची किंमत १४९९ असल्याचे दिसून येते.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर एअर प्युरिफायर १४९९ मध्ये उपलब्ध आहे. त्याचे नाव EVATTA वेअरेबल एअर प्युरिफायर आहे. ते मानेवर लावून घेऊ शकता. हे प्युरिफायर हवेतील ९९.९ टक्के प्रदूषक काढून टाकू शकते आणि हानिकारक कण वेगळे करू शकते.

तर दुसरे, डायमट्रस वेअरेबल एअर प्युरिफायर नेकलेस नावाचे प्युरिफायर बाजारात उपलब्ध आहे. अमेझॉन इंडियावर त्याची किंमत २८८९ आहे. यात ५००mAh रिचार्जेबल बॅटरी आहे. म्हणून, ती रिचार्ज केली जाऊ शकते आणि वारंवार वापरली जाऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!