नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने भारतीय मार्केटमध्ये दोन फ्लॅगशिप फोन Vivo X300 आणि Vivo X300 Pro फोन लाँच केले आहेत. तुम्ही आता हे स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यांची विक्री १० डिसेंबरपासून सुरू झाली. दोन्ही फोन शक्तिशाली कॅमेरा कॉन्फिगरेशनसह मिळत आहेत.
तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट, अमेझॉन, विवोच्या अधिकृत स्टोअर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. हे फोन ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील उपलब्ध आहेत. कंपनीने विवो X300 तीन कलरमध्ये आणले आहेत. 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंट ७५९९९ रुपयांना मिळत आहे. तर १२GB RAM + ५१२GB स्टोरेज व्हेरिएंट ८१९९९ मध्ये उपलब्ध आहे, तर १६GB RAM + ५१२GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत ८५,९९९ आहे.
हा फोन समिट रेड, मिस्ट ब्लू आणि एलिट ब्लॅक रंगात येतो. Vivo X300 Pro १६GB RAM + ५१२ GB स्टोरेजसाठी १०९९९९ किंमत आहे. तो एलिट ब्लॅक आणि ड्यून गोल्ड रंगात येतो.
ऑफर नेमकी काय?
कंपनी या फोनवर लाँच ऑफर्स देखील देत आहे. यामध्ये एसबीआय, एचडीएफसी, कोटक, आयडीएफसी फर्स्ट आणि येस बँक कार्डवर १०% कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही Vivo X300 सीरीज नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. ऑफर अंतर्गत, स्मार्टफोन शून्य डाउन पेमेंटसह ३१६७ च्या मासिक ईएमआयवर उपलब्ध असतील. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.


