नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात Xiaomi आता नवा Redmi Note १५ सीरीज लवकरच भारतात लाँच करणार आहे. कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे टीझिंग सुरू केले आहे. ही सीरीज आधीच चीनी मार्केटमध्ये लाँच झाली आहे. आता भारतात लाँच होण्याचा अंदाज आहे.
Xiaomi चा सब-ब्रँड या सीरीजमधील तीन फोन लाँच होण्याची शक्यता आहे. Redmi Note १५, Note १५ Pro आणि Note १५ Pro Plus असे फोन असणार आहेत. कंपनी प्रथमच Redmi Note १५ लाँच करेल, त्यानंतर प्रो व्हेरिएंट लाँच करेल. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हा फोन ६ जानेवारी रोजी भारतात लाँच होईल, असे सांगण्यात येत आहे. कंपनी हा फोन २०००० ते २५००० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करू शकते. कंपनीने फोनच्या टीझरमध्ये एक स्लिम फोन डिझाइन दाखवले आहे, जे त्याचे यूएसपी असण्याची शक्यता आहे.
कंपनीने भारतात लाँच केलेला फोन चीनमध्ये सादर केलेल्या रेडमी नोट १५ पेक्षा वेगळा आहे. हा फोन ६.७७ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्लेसह येईल आणि १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६ जनरल ३ प्रोसेसर असण्याचा अंदाज आहे. कंपनीने १०८MP कॅमेरा देखील दाखवला आहे. चीनी व्हेरिएंटमध्ये ५०MP कॅमेरा आहे. कंपनी भारतात काही बदलांसह हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे.


