Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली; लग्नसोहळा अनिश्चितकाळासाठी स्थगित

Smriti Mandhana : स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली; लग्नसोहळा अनिश्चितकाळासाठी स्थगित

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा रविवारी (ता. २३) सांगलीत होणार असलेला विवाहसोहळा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सकाळीच स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पलाश मुच्छल याचीही तब्येत बिघडली असून, त्यांना व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्यामुळे उपचार घ्यावे लागले.

स्मृतीच्या वडिलांचा हा अचानक आजार हा विवाहसोहळ्याच्या आनंदाच्या वातावरणात खरा धक्का ठरला. सकाळी नाश्त्यादरम्यान श्रीनिवास मानधना यांना छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही सुधारणा नसल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सरव्हिट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एंजिओग्राफी करण्याची शक्यता सांगितली असून, सध्या ते निगराणीखाली आहेत. रक्तदाब किंचित वाढलेला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

स्मृतीच्या व्यवस्थापक तोहीन मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले, “स्मृतीचे वडील नाश्ता करताना अचानक आजारी पडले. आम्ही थोडे थांबलो, पण स्थिती आणखी बिघडली. एंब्युलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात नेले. स्मृतीला वडिलांशी खूप जवळीक आहे, त्यामुळे तिने लग्न स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते पूर्ण बरे होत नाही, तोपर्यंत लग्न होणार नाही.”

दरम्यान, श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असताना पलाश मुच्छल याचीही तब्येत बिघडली. व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर ते हॉटेलवर परतले असले तरी, कुटुंबीयांनी परिस्थिती गंभीरतेने घेतली आहे. पलाश आणि मानधना कुटुंबीयांनी एकत्रितपणे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!