Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gauri Death Case : गौरी आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; मध्यरात्री पोलिसांनी फास आवळला

Gauri Death Case : गौरी आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; मध्यरात्री पोलिसांनी फास आवळला

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंचा वैयक्तिक सहायक अनंत गर्जे याला गौरी गर्जे (पालवे) आत्महत्याप्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २२) सायंकाळी वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी गौरीने (वय २८) गळफास घेतला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या अनंतला रविवारी (ता. २३) मध्यरात्री एक वाजता वरळी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाने खळबळ उडाली असून, गौरीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

वरळी पोलिस ठाण्यात गौरीच्या वडिलांच्या तक्रारीवर आधारित अनंत गर्जे, त्याच्या भावाला व बहिणीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ८५ (पती/नातेवाईकांकडून पत्नीचा छळ), ३५२ (दुखापत) व ३५१(२) (अपमानजनक कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गौरी केईएम रुग्णालयात दंतविभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. पोस्टमार्टम अहवालानुसार आत्महत्या झाल्याचे निदान झाले असले तरी कुटुंबीयांनी हत्येचा संशय उपस्थित करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गौरीच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अनंतचे एका ‘किरण’ नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडणे व्हायची. लातूर येथील दवाखान्यात त्या महिलेचा गर्भपात करण्यात आला असून, कागदोपत्री अनंतच पती म्हणून नोंदणीकृत होता.

ही कागदपत्रे गौरीला मिळाल्यानंतर अनंतकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. काही दिवसांपूर्वीच गौरीच्या आई-वडिलांनी वरळीतील घरी भेट दिली तेव्हा तिच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसले, ज्याबाबत तिने स्पष्टीकरण दिले नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!