मुंबई : शहनाज गिलला ‘बिग बॉस १३’ मधून चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या प्रसिद्धीनंतर तिला सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. मात्र, ती फक्त काही चित्रपटांमध्ये दिसली आणि गाणी गायल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर, शहनाजने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आणि ‘इक कुडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
शहनाज गिलने अलीकडेच हा मार्ग का निवडला याबद्दल सांगितले, सर्वजण बॉलिवूडच्या मागे धावत आहेत हे स्पष्ट केले. शहनाज तिच्या ‘इक कुडी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस १९ मध्ये आली होती. त्यामध्ये तिने म्हटले की, “कोणीही माझ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार नव्हते, म्हणून मी स्वतःच ते केले. मला यापूर्वी चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. त्यामुळे मी आता हा निर्णय घेतला आहे”.
शहनाज म्हणाली, “मला चांगल्या ऑफर मिळत नव्हत्या. चित्रपटांमध्ये माझा वापर केला जात होता. सर्व स्टोरी सारख्याच होत्या, त्यात काहीही नवीन नव्हते किंवा संदेश नव्हता. मला अनेक ऑफर्स येत होत्या, पण मला असे वाटले की मला इन्व्हेस्ट करण्यासारखे काहीतरी हवे आहे. गेल्या पाच वर्षांपासून पंजाबी चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या, पण मला काहीतरी वेगळे हवे होते. मी ३-४ वर्षांनी पंजाबी इंडस्ट्रीत परत येत होते, म्हणून मला काहीतरी वेगळे करायचे होते, असे तिने म्हटले आहे.


