Today बुधवार, 29th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची बॉक्स ऑफिसवर धूम; दमदार केली कमाई…

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची बॉक्स ऑफिसवर धूम; दमदार केली कमाई…

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे रिलीज होत आहे. त्यात ‘भूत बंगला’ बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवत आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत आणि ११ व्या दिवशीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चाहते चित्रपटावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

‘भूत बंगला’ चित्रपटाने ११ व्या दिवशी ३.६५ कोटींची कमाई केली. चित्रपटाचे ८७५५ शो झाले आणि ११% प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली. चित्रपटाच्या ११ व्या दिवसाच्या कमाईचे अधिकृत आकडे अद्याप उपलब्ध नाहीत. मात्र, जर चित्रपटाने ११ व्या दिवशी ३.६५ कोटींची कमाई केली, तर चित्रपटाची एकूण कमाई ११७.०५ कोटींपर्यंत पोहोचेल. हा चित्रपट १२० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता. त्याची एकूण कमाई ११७.०५ कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे ज्या गतीने तो कमाई करत आहे, त्या दराने तो मंगळवारी आपले बजेट पूर्णपणे वसूल करेल.

‘भूत बंगला’ची कमाई नेमकी किती?

चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमध्ये ३.७५ कोटी जमा केले आणि १२.२५ कोटींची दमदार ओपनिंग केली. अक्षयच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १९ कोटी जमा केले. तिसऱ्या दिवशी, चित्रपटाला रविवारच्या यशाचा फायदा झाला आणि त्याने २३ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी चित्रपटाने ६.७५ कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी चित्रपटाने ८ कोटी रुपये कमावले. सहाव्या दिवशी ६.१५ कोटींची कमाई केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!