Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सावध राहा ! एक धोकादायक अँड्रॉइड मालवेअर तुमच्या फोनचा घेऊ शकतो कंट्रोल

सावध राहा ! एक धोकादायक अँड्रॉइड मालवेअर तुमच्या फोनचा घेऊ शकतो कंट्रोल

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीनुसार, अनेक बदल केले जात आहेत. त्यात एक नवीन अँड्रॉइड मालवेअर सापडला आहे जो स्मार्टफोनमधील संवेदनशील माहितीची कॉपी करत आहे. या मालवेअरचे नाव पर्सियस (Perseus) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मालवेअर मोबाईल युजर्सची संवेदनशील माहिती सहजपणे चोरू शकतो.

रिपोर्ट्सनुसार, तो इतर गोष्टींबरोबरच बँक ओटीपी, पासवर्ड आणि आर्थिक माहिती स्कॅन करू शकतो. बऱ्याच केसेसमध्ये तो स्मार्टफोनवर पूर्णपणे ताबा मिळवतो. पर्सियस मालवेअर त्याच्या जुन्या आवृत्त्या, सर्बेरस (Cerberus) आणि फिनिक्स (Phoenix) वर आधारित आहे. हा नवीन प्रकार अधिक धोकादायक आहे, कारण सायबर हॅकर्स त्याचा वापर कोणत्याही मोबाईल युजर्सला लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. मालवेअर सामान्यतः लॉगिन डिटेल्स चोरतो. मात्र, हा नवीन प्रकारचा मालवेअर युजर्सच्या नोट्सची देखील कॉपी करू शकतो, ज्यामुळे त्याला वैयक्तिक तपशील सहजपणे मिळवता येतात.

पर्सियस किंवा इतर कोणत्याही मालवेअरपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, या प्रकारचा मालवेअर पसरवणारे ॲप्स टाळणे महत्त्वाचे आहे. हा मालवेअर स्वतःला आयपीटीव्ही सेवा म्हणून ओळख देणाऱ्या ॲप्सद्वारे पसरतो. हे गूगल प्ले स्टोअरच्या बाहेर अस्तित्वात असतात आणि थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे इन्स्टॉल केले जातात.

फोन सुरक्षित ठेवण्यासाठी…

स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याची ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच, फक्त अधिकृत ॲप स्टोअरवरूनच ॲप्स इन्स्टॉल करा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!