Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्हीही इंडक्शन वापरताय? तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर फुटू शकते कुकटॉपची काच…

तुम्हीही इंडक्शन वापरताय? तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर फुटू शकते कुकटॉपची काच…

नवी दिल्ली : सध्या इराण युद्धामुळे मोठा इंधन तुटवडा जाणवत आहे. त्यातच एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यातही अडचणी आहेत. त्यामुळेच इंडक्शन वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. इंडक्शन कुकटॉप प्रत्येक स्मार्ट किचनचा एक भाग बनले आहेत. ते स्वयंपाक जलद आणि सुरक्षित करतात. मात्र, त्यांची वरची काचेची पॅनेल बरीच नाजूक असते. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

तुमच्या कुकटॉपच्या सभोवतालचे वातावरण देखील त्याची सुरक्षितता ठरवते. कुकटॉपच्या अगदी वर असलेल्या कॅबिनेटमध्ये हेवी डबे, बरण्या किंवा मसाले ठेवू नका याची काळजी घ्या, कारण कुकटॉपवर चुकून कोणतीही जड वस्तू पडल्यास काच नक्कीच फुटेल. तसेच, इंडक्शन कुकटॉप बंद असतानाही, त्याचा वापर कधीही अतिरिक्त काउंटर म्हणून, चॉपिंग बोर्ड म्हणून किंवा जड वस्तू ठेवण्याची जागा म्हणून करू नका. नेहमी लक्षात ठेवण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इंडक्शन कुकटॉपवर रिकामे भांडे ठेवून ते कधीही चालू करू नका. असे केल्याने काही सेकंदातच खूप उष्णता निर्माण होते, ज्यामुळे तुमच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचे आणि कुकटॉपच्या काचेचे गंभीर नुकसान होऊ शकते.

कुकटॉपच्या लाईफसाठी योग्य स्वच्छता आणि देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. स्वयंपाक करताना काचेवर काही सांडल्यास किंवा साखर पडल्यास, ते चिकटून राहू देऊ नका किंवा घट्ट होऊ देऊ नका. जर हे डाग तसेच राहिले, तर पुढच्या वेळी कुकटॉप गरम झाल्यावर ते हॉट स्पॉट्स (उष्णतेचे केंद्र) तयार करू शकतात, ज्यामुळे काचेवर दाब येतो आणि ती फुटण्याचा धोका निर्माण होतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!