Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अशोक खरातसोबतच्या फोटोचं सत्य काय? दीपक केसरकरांनी मांडली आपली भूमिका; संजय राऊतांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर

अशोक खरातसोबतच्या फोटोचं सत्य काय? दीपक केसरकरांनी मांडली आपली भूमिका; संजय राऊतांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर

Deepak Kesarkar: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबतचा एक फोटो चर्चेत आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना केसरकर यांनी सांगितले की, खरातशी झालेली ओळख केवळ एका मंदिर विकास कामापुरती मर्यादित होती. “ईशान्येश्वर मंदिराच्या रस्त्याबाबत चर्चा करण्यासाठी खरात एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते, त्याच वेळी माझी त्यांच्याशी पहिली ओळख झाली. केवळ फोटोवरून कोणाच्या चारित्र्यावर संशय घेणे चुकीचे आहे,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक जीवनाशी कोणताही संबंध नाही
दीपक केसरकर यांनी पुढे स्पष्ट केले की, खरातचा ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रात (Astronomy) अभ्यास असल्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या संपर्कात होत्या. व्हायरल होत असलेला दुसरा फोटो खरातच्या मुलीच्या लग्नातील असून, तिथे निमंत्रितांपैकी एक म्हणून मी उपस्थित होतो. “खरातचे कृत्य घृणास्पद असून त्याचा मी तीव्र निषेध करतो, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काळ्या कारनाम्यांची मला पुसटशीही कल्पना नव्हती. केवळ ओळखीच्या लोकांची नावे या प्रकरणात ओढणे दुर्दैवी आहे,” असेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले.

‘मंत्रालय चालवण्याचे आरोप धादांत खोटे’
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचा केसरकर यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात आले नाहीत, त्यामुळे त्यांनी माझे शिक्षण खाते चालवले किंवा बदल्यांमध्ये हस्तक्षेप केला, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. शिक्षण मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय हे पारदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच होते, असा दावाही त्यांनी केला. राऊत यांचे आरोप केवळ राजकीय चिखलफेक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तपास यंत्रणांवर विश्वास आणि अफवांना पूर्णविराम
अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी (SIT) करत असून, सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. “मी मुंबईबाहेर असल्याने यावर भाष्य करू शकलो नव्हतो, परंतु आता वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे गरजेचे वाटले,” असे ते म्हणाले. खरातसोबत केवळ सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्यामुळे कोणालाही दोषी ठरवणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!