Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! दोन ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग; चालकाचा केबिनमध्येच होरपळून अंत

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! दोन ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग; चालकाचा केबिनमध्येच होरपळून अंत

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. भरधाव ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत चालकाचा जागीच जळून मृत्यू झाला. वालई ते दोनद दरम्यान झालेल्या या अपघातात ट्रकचा अक्षरशः कोळसा झाला आहे.

नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने जाणारा एक ट्रक प्रचंड वेगात होता. वालई परिसरात पोहोचताच या ट्रकने लोखंडी रोल वाहून नेणाऱ्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पुढच्या ट्रकमधील अवाढव्य लोखंडी रोल उसळले आणि मागच्या ट्रकच्या केबिनवर येऊन पडले. यामुळे ट्रकची केबिन पूर्णपणे दबली गेली.

केबिनमध्ये अडकला जीव; सुटकेचा प्रयत्न ठरला निष्फळ
दत्तात्रय खडतरे (रा. सांगोला, जि. सांगली) असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. केबिन दबल्यामुळे खडतरे हे आतमध्येच अडकले होते. त्यांनी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने पेट घेतला. आगीचा भडका इतका मोठा होता की, बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच खडतरे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
या घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र, तोपर्यंत आगीने ट्रक आणि चालकाला पूर्णतः कचाट्यात घेतले होते.

पोलिस कारवाई
घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!