Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ जमिनी जप्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने जमीन माफियांना जबर धक्का

पुणे प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ जमिनी जप्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने जमीन माफियांना जबर धक्का

Pune Collector Action : पुणे जिल्ह्यात जमीन गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत थेट १५ जमिनी जप्त केल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे जमीन माफियांचे धाबे दणाणले असून पुण्याच्या रिअल इस्टेट आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनींच्या अटी-शर्तींचा भंग करून त्यावर स्वतःचे साम्राज्य उभारणाऱ्यांना प्रशासनाने थेट दणका दिला आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सर्व जमिनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील देवस्थान, वतन, आदिवासी तसेच शासनाने भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

या तपासणीत तब्बल ३६० प्रकरणांमध्ये शर्तभंग झाल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत १५ जमिनी प्रत्यक्ष ताब्यात घेतल्या आहेत.

याशिवाय ६ प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आले असून, उर्वरित ३०० हून अधिक प्रकरणांवर पुढील महिनाभरात निर्णय होण्याची शक्यता आहे.

‘बॉटॅनिकल गार्डन’ घोटाळ्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

मुंढवा येथील बॉटॅनिकल गार्डन, बोपोडीतील कृषी विभागाची जागा आणि ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनींशी संबंधित गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर महसूल प्रशासन हादरले होते. या प्रकरणांनी मोठा वाद निर्माण झाल्यानंतर महसूल विभागाने सखोल तपास मोहीम हाती घेतली.

याच तपासातून अनेक धक्कादायक गैरव्यवहार समोर आले असून, प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत थेट जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जमीन गैरव्यवहार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!