Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rahul Gandhi : ‘अमृत काळ नव्हे, हा तर विष काळ…’; NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : ‘अमृत काळ नव्हे, हा तर विष काळ…’; NEET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi On NEET Paper Leak: देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या गंभीर मुद्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. “हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून, भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेने तरुणांच्या स्वप्नांवर केलेला दरोडा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, वाढता जनक्षोभ लक्षात घेता केंद्र सरकारने या प्रकरणाची सूत्रे तातडीने CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) कडे सोपवली आहेत.

‘पालकांचे दागिने विकले, पण पदरी पडली फसवणूक’
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, “कठोर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लिलाव केला जात आहे. अनेक पालकांनी कर्ज काढून किंवा स्वतःचे दागिने विकून मुलांच्या कोचिंगसाठी पैसे जमा केले होते. मात्र, आज त्यांच्या वाट्याला केवळ पेपरफुटी आणि मानसिक छळ आला आहे.” केंद्र सरकारच्या ‘अमृत काळा’वर टीका करताना, हा काळ देशातील युवकांसाठी ‘विष काळ’ ठरत असल्याचा बोचरा वारही त्यांनी केला.

पेपर माफियांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह
शिक्षणातील ‘संघटित भ्रष्टाचारा’चा उल्लेख करत राहुल गांधींनी सरकारला जाब विचारला. “जर देशात भविष्य मेहनतीवर नाही, तर पैसा आणि वशिल्यावर ठरणार असेल, तर प्रामाणिक विद्यार्थ्याने जायचे कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे ‘पेपर माफिया’ अधिक प्रबळ होत असून सरकारी यंत्रणा हतबल झाल्याची टीका त्यांनी केली.

तपासातील धक्कादायक माहिती आणि परीक्षा रद्द
राजस्थानमधील सीकर येथून फुटलेल्या या पेपरमध्ये ‘गेस पेपर’मधील तब्बल 120 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे समोर आले आहे. NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने या गोंधळानंतर परीक्षा अधिकृतपणे रद्द केली आहे. आता सीबीआय या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!