Viral Video: चित्रपट आणि वास्तवातलं अंतर कधी कधी धूसर होतं, याचाच प्रत्यय पीलीभीतमध्ये आला आहे. ‘शोले’ चित्रपटातील वीरूची स्टाईल आता एका तरुणीने कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या प्रियकराशी लग्न लावून द्यावे, या मागणीसाठी ही तरुणी चक्क गावातील उंच पाण्याच्या टाकीवर चढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरत असून गावकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला होता.
पाण्याच्या टाकीवर हायव्होल्टेज ड्रामा
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, ही तरुणी टाकीच्या अगदी टोकावर उभी राहून जोराने ओरडत होती. तिने प्रशासनाला आणि कुटुंबीयांना स्पष्ट इशारा दिला की, जोपर्यंत तिचे लग्न तिच्या आवडीच्या मुलाशी लावून देण्याचे मान्य केले जात नाही, तोपर्यंत ती खाली उतरणार नाही. तरुणीचा हा अवतार पाहून गावकरी घाबरले आणि त्यांनी तिला खाली उतरवण्यासाठी विनवणी करण्यास सुरुवात केली, पण तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होती.
गावकऱ्यांची गर्दी आणि गोंधळ
टाकीच्या खाली शेकडो लोकांची गर्दी जमली होती. लोक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण हा ‘शोले’ स्टाईल ड्रामा आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. बराच वेळ हा तणाव सुरू होता. “माझं लग्न लावून द्या, नाहीतर मी उडी मारेन,” अशा धमक्या ही तरुणी देत होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
प्रेमी से शादी की जिद को लेकर पानी की टंकी पर चढ़ी युवती, पीलीभीत से सामने आया वीडियो pic.twitter.com/t7HFkL647E
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 12, 2026
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
@AnathNagrik या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो आता लाखो लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, “येथे बसंती आपल्या वीरूसाठी टाकीवर चढली आहे!” दुसऱ्याने म्हटलं, “अशा मुली नेमक्या मिळतात कुठे?” तर एका तरुणाने मिश्किलपणे लिहिले, “माझी वाली कधी माझ्यासाठी असं काही करेल का?” प्रेमात पडल्यावर लोक काय करतील याचा नेम नाही, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


