पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. सोन्या चांदीचे दागिने, मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढ शुध्द ०१, दि. २६ जून ते आषाढ शुध्द १५, दिनांक १० जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण, २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३२ लाख ४५ हजार ६८२ रूपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावखे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १ कोटी २४ लाख ५ हजार ७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा/बसचे ३२ लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७०६६९४ रुपये अर्पण, २६९२२५७८ रुपये देणगी, ९८५३००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ५०६०४३७ रुपये भक्तनिवास, ९३५५०७३ रुपये हुंडीपेटी, ३१७९०६८ रूपये परिवार देवता तसेच २२१५३६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून ६२८१०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
सन २०२४ च्या आषाढी यात्रेत रू.८४८५८५६०/ व या वर्षीच्या यात्रेत रू. १०८४०८५३१/ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.२३५४९९७१ /- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.


