Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहतील; नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहतील; नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

मुंबई: भाजप मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहतील. त्यांचा आवाज असा आहे की त्याचा त्यांना फायदा होईल. ते पाकिस्तान झिंदाबादचे नारेही देतील, अशी वादग्रस्ती टिपण्णी नितेश राणे आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात राणे आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत आहेत.

नितेश राणे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहिले आहेत. हिंदी भाषेवरील वादाच्या वेळी त्यांनी म्हटले होते, ‘जर उद्धव ठाकरे बीएमसी निवडणुकीत जिंकले तर मुंबईचे महापौर अब्दुल किंवा शेख होतील, तर मुंबईचे हिंदू सुरक्षित राहतील का? तसेच त्यांनी म्हटलं होतं की, ‘जर तुम्हाला शाळा बंद करायच्या असतील तर मदरसे बंद करा. तिथे दहशतवाद शिकवला जातो, तलवारी सापडतात. तिथे मराठी कोण शिकते? जर तुम्हाला कोणाच्या कानात मारायचे असेल तर मीरा रोडच्या (मुस्लिमबहुल) नया नगरमध्ये मारा. तिथे सभा व्हायला हवी होती. तिथे शरिया कायदा पाळला जातो. जर उद्धव जिंकले तर मुंबईचे महापौर अब्दुल किंवा शेख होतील, मग मुंबईचे हिंदू सुरक्षित राहतील का? जिहादी देशाला इस्लामिक राष्ट्र बनवू इच्छितात, अशी टिका देखील नितेश राणे यांनी केली होती.

दरम्यान, नितेश राणे यांनी दुकानदाराला मारहाण करणाऱ्यांना आव्हान दिले होते की गोल टोपी घालणाऱ्यांना मराठी बोलायला लावा.गरीब हिंदूंना मराठी न बोलल्याने मारहाण केली जात आहे, पण दाढी आणि गोल टोपी असलेल्यांना कोणीही काहीही बोलत नाही. त्यांनी शिवसेना यूबीटी आणि मनसे कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आणि म्हटलं की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नाल बाजार आणि मोहम्मद अली रोडवर लोकांना मराठी बोलायला लावावे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!