Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईतील गोवंडीमध्ये कारची धडक लागल्याने हत्या

मुंबईतील गोवंडीमध्ये कारची धडक लागल्याने हत्या

गोवंडी : कारच्या धडकेत आईला दुखापत झाल्याने दोन मुलांनी निघृणपणे चाकूने सपासप वार करून ३८ वर्षीय कार चालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोवंडीतील करमण मामा नगरमध्ये घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून शिवाजी नगर पोलिसांनी अब्दुल करीम शेख ऊर्फ दादू आणि मोहम्मद शरीफ अब्बास अली शेख ऊर्फ पप्पू यांना बेड्या ठोकल्या आहेत.

‘पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हे हत्याकांड घडले. गोवंडीतील करमण मामा नगरमध्ये कुटुंबासोबत राहात असलेले आदिल तालीम खान (३८) हे कारने जात असताना त्यांच्या कारची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवर असलेली महिला जखमी झाली. आईला लागल्याच्या कारणावरून आरोपी दादू आणि पप्पू यांनी कार चालक आदिल खान यांच्याशी वाद घातला.

रात्री अकराच्या सुमारास दादू आणि पप्पू यांनी आदिल खान यांच्या घरी जात त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. आदिल खान हे गंभीर जखमी होऊन खाली कोसळताच दोघांनी तेथून पळ काढला. चाकू हल्ल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी हल्ल्याची माहिती पोलिसांना देत जखमी अवस्थेतील आदिल यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!