Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुमचा फोन हरवला आहे का? तर घाबरू नका; आता पटकन येईल शोधता…

तुमचा फोन हरवला आहे का? तर घाबरू नका; आता पटकन येईल शोधता…

सध्या आपल्यापैकी अनेकांकडे स्मार्टफोन असेल. या आजच्या डिजिटल युगात, स्मार्टफोन हे केवळ एक गॅझेट नसून, आपल्या ओळखीचा, कामाचा आणि वैयक्तिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर चिंता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, हा हरवलेला फोन तुम्हाला आता सापडू शकतो. होय, तेही एका सेटिंगमुळे.

सध्या सर्वच स्मार्टफोनमध्ये Find My Device हे फीचर उपलब्ध आहे. गुगलचे ‘फाईंड माय डिव्हाइस’ हे एक असे साधन आहे जे तुमच्या स्मार्टफोनचे स्थान शोधण्यात मदत करते. हे फीचर तुमच्या फोनच्या जीपीएस, इंटरनेट आणि गुगल खात्यासोबत काम करते. तुमचा फोन ऑनलाईन येताच, तुम्ही त्याचे थेट लोकेशन पाहू शकता. हे फीचर वापरण्यासाठी काही पूर्व-अटी आहेत. सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये गुगल अकाउंट लॉग इन केलेले असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, फोनचे इंटरनेट आणि स्थान सेटिंग्ज चालू असणे आवश्यक आहे. जर हे सक्षम केले असेल, तर तुमचा फोन शोधणे खूप सोपे होते.

जर तुमचा फोन हरवला असेल, तर प्रथम दुसऱ्या डिव्हाइसवरून ‘फाइंड माय डिव्हाइस’ (Find My Device) वेबसाइट किंवा ॲप उघडा. त्यानंतर तुमच्या गुगल अकाउंटद्वारे लॉग इन करा. एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर, तुमच्या फोनचे लोकेशन नकाशावर दिसेल. तुम्ही तुमचा फोन मोठ्या आवाजात वाजवू शकता, ज्यामुळे तुम्ही जवळपास असाल तर तो शोधणे सोपे होईल. विशेष म्हणजे, हे वाजणे सायलेंट मोडमध्येही काम करते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!