पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोली येथे हॉस्टेल सुपरिटेंडंट, सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यासाठी 8 जानेवारी 2026 या दिवशी मुलाखत द्यावी लागणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : हॉस्टेल सुपरिटेंडंट, सल्लागार.
– नोकरीचे ठिकाण : बसमतनगर, जि-हिंगोली.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 08 जानेवारी 2026.
– मुलाखतीचा पत्ता : मुख्याध्यापक कार्यालय, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, बासमथनगर, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र पिन -431512.


