Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss : ‘मस्करीच्या नावाखाली शेहबाज करतोय गैरवर्तन’; शहनाज गिलच्या भावाला सलमान खानने चांगलेच फटकारले

Bigg Boss : ‘मस्करीच्या नावाखाली शेहबाज करतोय गैरवर्तन’; शहनाज गिलच्या भावाला सलमान खानने चांगलेच फटकारले

मुंबई : बिग बॉसच्या घरात अनेक गप्पा-गोष्टी, भांडणं होताना आपण पाहिली असतील. यानंतर सलमान खान काहींना फटकारतानाही दिसून आला. त्यातच आता या आठवड्यात दबंग सलमान खान अनेक घरातील सदस्यांना धडा शिकवणार आहे. शहनाज गिलचा भाऊ शेहबाजला अखेर सलमान खानने चांगलेच फटकारले. सलमानने फटकारल्यानंतर तो भावूक होताना दिसला.

शेहबाज हा बिग बॉस १९ मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून दाखल झाला. शोमध्ये सामील झाल्यापासून शेहबाज प्रेक्षकांना त्याची मजेदार बाजू दाखवत आहे. तो बहुतेकदा विनोद करताना दिसतो. इतकेच नाहीतर भांडण्याच्या वेळीही शेहबाज कधीच गंभीर दिसत नाही. घरातील सदस्यांना त्याची विनोदी शैली मनोरंजक वाटते. पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. विनोदाच्या नावाखाली घरातील सदस्यांना शेहबाज धमकावू लागला आहे. शेहबाजने शोमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. सलमान खानने त्याला फटकारले आणि मर्यादेत राहण्याची सूचना केली.

शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान रागाने शेहबाजला सांगताना दिसत आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. तू नेहमीच विनोद करतोस…तू प्रेक्षकांना असभ्य आणि अत्यंत त्रासदायक दिसतोस. सलमान खानने फटकारल्यानंतर शेहबाज भावनिक झाला. आता याच एपिसोडची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!