Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: पुणे महानगरपालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा; कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई

Pune News: पुणे महानगरपालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा; कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई

पुणे: पुणे महानगरपालिका (Pune News) आयुक्तांनी आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी शेवाळवाडी व मांजरी परिसराला भेट देऊन शहरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण तसेच नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्यांची पाहणी केली. या भेटीदरम्यान परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांवरील कचरा आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भेटीदरम्यान संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे आयुक्तांनी अकार्यक्षम व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन तसेच अकार्यकारी पदावर बदलीची कारवाई करण्यात येईल.

याच वेळी, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता श्री. रवि खंदारे यांच्या नियुक्तीचे आदेश तातडीने देण्यात आले. तसेच, माननीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर समाधानकारक काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी मागील दोन दिवसांपूर्वी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाघोली भागात झालेल्या पाहणी दरम्यानही आयुक्तांनी ड्रेनेज व अतिक्रमण समस्यांबाबत निष्क्रियतेसाठी श्रीमती शितल वाकडे, सहाय्यक आयुक्त,नगर रोड व ड्रेनेज विभागातील उप अभियंता श्री विनायक शिंदे व श्री गणेश पुरम या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.

पुणेसोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दल देखील आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागांना स्वच्छता सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.”

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!