Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bharat Gogwale : भरत गोगवलेंच्या मुलावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Bharat Gogwale : भरत गोगवलेंच्या मुलावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अलिबाग : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत (२ डिसेंबर) रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सुशांत जाबरे यांच्या तक्रारीनुसार, शिवसेना कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गाड्या फोडल्या, मारहाण केली, अंगरक्षकाची रिव्हॉल्वर हिस्कावली आणि सोन्याचे दागिने व मोबाइल लंपास केले. या घटनेने महायुतीतच अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र आहे, तर पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

महाड तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झालेल्या या गुन्ह्यात विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालूसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालूसरे, वैभव मालूसरे, सुरज मालूसरे, सिद्धेश शेठ आणि इतर अनोळखी ८-१० जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. गुन्हा महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत मारहाण, तोडफोड, लूटसाड आणि शासकीय कामात अडथळा यासंबंधी कलमे लावण्यात आली आहेत.

राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक २ च्या मतदान बूथवर आढावा घेण्यासाठी गेलो असता शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या सोबत असलेल्या पाच जणांना गंभीर दुखापत झाल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

मतदानाच्या सकाळी सुमारे ९ वाजता नवेनगर परिसरातील प्रभाग क्रमांक २ च्या मतदान केंद्रावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. राष्ट्रवादी कार्यकर्ते बूथवर ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींसाठी गेले असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यातून हाणामारी सुरू झाली, ज्यात राष्ट्रवादीच्या गाड्यांची तोडफोड, मारहाण आणि लूटसाड झाल्याचे आरोप आहेत. सुशांत जाबरे यांच्या अंगरक्षकाची रिव्हॉल्वर हिस्कावून घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे, तर सोन्याची चेन आणि मोबाइल फोन लंपासले गेले.

दुसरीकडे, विकास गोगावले यांनी प्रतिहल्ला केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली होती, जी शिवसेना कार्यकर्त्यांनी हिस्कावून घेत पोलिसांच्या ताब्यात दिली. “राष्ट्रवादीने परराज्यातील लोक आणून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप विकास गोगावले यांनी केला असून, पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र हे सर्व खोटे सांगितले असून, “विकास गोगावले यांनीच महाडमध्ये दहशत निर्माण केली,” असे स्नेहल जगताप (राष्ट्रवादी नेत्य) यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, ४०-५० शिवसैनिकांनी जाबरे यांना रोखून मारहाण केली आणि गाड्या फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महाडमध्ये तणाव वाढला असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!