Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

”अजित पवार म्हणाले होते, जर शेतकऱ्याला लाईट बिल आलं, तर पवारांची औलाद सांगणार नाही; आता थकबाकीसह बिले का आली?”

”अजित पवार म्हणाले होते, जर शेतकऱ्याला लाईट बिल आलं, तर पवारांची औलाद सांगणार नाही; आता थकबाकीसह बिले का आली?”

मुंबई : राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली होती. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, पुढे पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली, तर पवारांची औलाद सांगणार नाही. निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिले वाटण्यात आली. परंतु, विधानसभा निवडणूक निकालानंतर थकबाकीसह बिले पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत भूमिका पक्षात करावी, असे देखील कैलास पाटील म्हणाले.

महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवले आहे. केवळ निवडणूक काळात मतदान मिळवण्यासाठी खोटी आश्वासन दिले. सर्वत्र खोटी बिले वाटली. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना झिरो बिल देण्यात आले. त्या बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळतात. आमदार कैलास पाटील यांनी एका शेतकऱ्याचे वीज बिल दाखवले, ज्याला निवडणुकीपूर्वी झिरो बिल दिले होते. डिसेंबर महिन्याचे जे बिल आले आहे, त्यामध्ये 1 लाख 12 हजाराच्या थकबाकीसह बिल देण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारने विधानसभेत घोषणा केली, शेतकरी लगेच विश्वास ठेवतो. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिले वाटण्यात आली. आता त्यानंतर त्यांना थकबाकीची बिले येत असतील, तर त्या शेतकऱ्यांची भावना काय असेल, असं देखील आमदार कैलास पाटील म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिले येत आहेत. याबाबत सरकारने उत्तर द्यावे, असं देखील पाटील यांनी म्हटले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!