Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pankaj Bhoyar: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गमतीदार क्षण; मनासारखा फोटो मिळेना, मंत्र्यांनीच हातात घेतला कॅमेरा

Pankaj Bhoyar: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गमतीदार क्षण; मनासारखा फोटो मिळेना, मंत्र्यांनीच हातात घेतला कॅमेरा

Pankaj Bhoyar: सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. अशा वेळी विधानभवनाच्या परिसरात आगंतुक वर्गाला आपल्या आवडत्या मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढताना आपण नेहमीच पाहतो.

आज विधानसभेची विशेष बैठक असल्याने गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे सकाळीच विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावर हेही उपस्थित होते. आपल्या लवाजम्यासह दाखल झालेले गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विधानभवन परिसरात फोटो काढायची इच्छा झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा फोटोग्राफरही होता.

फोटो काढताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी फोटोग्राफरला काही सूचना दिल्या. मात्र फोटोग्राफर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फोटो काढत नसल्याचे दिसून आले. फोटो मनासारखा येत नसल्याने पंकज भोयर यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. तेथे उपस्थित असलेल्या काही व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरांनीही त्यांना फोटो काढून दाखवले, मात्र तरीही त्यांचे समाधान झाले नाही. अखेर स्वतः गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीच फोटोग्राफरची भूमिका स्वीकारली. त्यांनी आमदार समीर कुणावर यांचा फोटो काढून दाखवत, अशा पद्धतीने फोटो काढावा, असे फोटोग्राफरला मार्गदर्शन केले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नेहमीच गुलाबी थंडीची चर्चा होत असते. मात्र आज विधानभवन परिसरात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्वतः फोटोग्राफरची भूमिका निभावत आपल्या फोटोग्राफीच्या हौसेला वाट करून दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मंत्री महोदय विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले.

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

नागपूरात गेल्या आठवड्याभरापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले आहे. १७ ठिकाणी ‘एसआरए समूह पुनर्विकास’ प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधान परिषदेत केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!