Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर

नांदेड : भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मीनल खतगावकर यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नायगाव विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरु केल्याचे समजते.

कोण आहेत भास्करराव पाटील खतगावकर?

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. खतगावकर हे तीन वेळेस आमदार आणि तीन वेळेस खासदार राहिले आहेत. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये परत आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर हे देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. खतगावकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पुन्हा पक्ष बदलला. काँग्रेसमध्ये परत येऊन त्यांनी आपली स्नुषा डॉ. मीनल पाटील-खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देखील मिळवून दिली. मात्र, डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!