Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर प्रतीक्षा संपली ! एलॉन मस्क यांनी स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस भारतात आणली

अखेर प्रतीक्षा संपली ! एलॉन मस्क यांनी स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस भारतात आणली

नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे इंटरनेटलाही मागणी वाढली आहे. त्यात एलॉन मस्क यांच्याकडून नवीन सुपरफास्ट इंटरनेट सेवा लाँच केली गेली आहे. या इंटरनेट सर्व्हिसची फक्त भारतातच नाहीतर जगभरात चर्चा आहे. आता, अखेर ही सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरु झाली आहे.

स्टारलिंक इंडिया वेबसाईटनुसार, भारतातील स्टारलिंक स्कीम 8600 पासून सुरू होणार आहे. याशिवाय, युजर्संना हार्डवेअर किटसाठी 34000 द्यावे लागणार आहेत. खरेदी केल्यानंतर, तुम्ही ते स्वतः सेट करू शकता. कंपनीच्या मते, सेटअप पूर्ण झाल्यानंतर तुमचे इंटरनेट काम करण्यास सुरुवात करेल. कंपनी 30 दिवसांची चाचणी देखील देत आहे.

स्टारलिंकचा दावा आहे की, ही सेवा 99.9% अपटाइमसह येते आणि इंटरनेट व्यत्यय येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय, कंपनीने स्थिरतेबद्दल देखील महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत. ती देशात कुठेही स्थापित आणि वापरली जाऊ शकते. कारण हे इंटरनेट एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइटवर आधारित आहे. असे जरी असले तरी सध्या ते मर्यादित ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही स्टारलिंक इंडिया वेबसाईटला भेट देऊन प्लॅन आणि उपलब्धता तपासू शकता. वेबसाइटवर, तुम्ही स्थानानुसार वेगवेगळे प्लॅन आणि प्रमोशनल ऑफर्स पाहू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!