मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर ‘कमबॅक’ केले आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करू’मुळे चर्चेत आहे. कपिलच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट रिलीज व्हायला अजून बराच वेळ आहे. मात्र, कपिलकडून त्याचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले जात आहे.
आता, कपिल त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘लाफ्टर शेफ’च्या सेटला भेट देत आहे. ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे ही जरी मोठी गोष्ट नसली तरी कपिल तब्बल ११ वर्षांनी टीव्हीवर परतत आहे. कपिल शर्माने कलर्स टीव्हीसोबतचा त्याचा ११ वर्षांचा जुना वाद मिटवला आहे. तो चॅनलच्या नवीन शो ‘लाफ्टर शेफ ३’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये त्याचे जुने सहकारी कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग देखील दिसतील. कपिलचे चॅनलवर परतणे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
कपिल आता भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांच्यासोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. अनेक वर्षांनंतर तो आता एकत्र कॉमेडी करताना दिसणार आहे. कपिल पुन्हा एकदा त्याच्या जुन्या टीमसोबत धमाल करण्यास सज्ज आहे. कलर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. आता त्याची चर्चा सुरु झाली आहे.


