Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

YouTube चे ‘रेड डायमंड बटण’ नेमकं कोणाला मिळते? किती सबस्क्राइबर्सची असते गरज…

YouTube चे ‘रेड डायमंड बटण’ नेमकं कोणाला मिळते? किती सबस्क्राइबर्सची असते गरज…

नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर वाढताना पाहिला मिळत आहे. त्यात व्हिडिओसाठी YouTube चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. यातून कमाईदेखील होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या युट्यूबवरील क्रिएटर्ससाठी वाढणारे सबस्क्राइबर्स ही केवळ संख्याच नाही तर त्यांच्या प्रवासाचा आणि कठोर परिश्रमाचा पुरावा आहे.

YouTube कडून वेळोवेळी त्यांच्या क्रिएटर्ससाठी विशेष प्ले बटणे देऊन सन्मानित केले जाते. यापैकी सर्वात मोठा आणि सर्वात अवघड असणारा प्रवास म्हणजे ‘रेड डायमंड क्रिएटर अवॉर्ड’. हा अवॉर्ड फक्त त्या चॅनेलना दिला जातो ज्यांनी १०० दशलक्ष (१० कोटी) सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. हा अवॉर्ड अशा क्रिएटर्सना दिला जातो, ज्यांनी YouTube च्या जगात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. आजपर्यंत, खूप कमी निर्माते या स्थानावर पोहोचू शकले आहेत आणि म्हणूनच हा पुरस्कार अतिशय खास मानला जातो.

‘रेड डायमंड प्ले बटण’ मिळवण्यासाठी फक्त १०० दशलक्ष सबस्क्राइबर्स असणे पुरेसे नाही. यासोबतच, काही कठोर अटी पूर्ण कराव्या लागतात. चॅनेल अॅक्टिव्ह असला पाहिजे आणि गेल्या सहा महिन्यांत किमान एक अपलोड केलेला असावा. चॅनेलवर कोणतेही समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन नसावे. तसेच कंटेंट पूर्णपणे मूळ आणि प्रामाणिक असावा, कॉपी-पेस्ट किंवा स्पॅम नसावा. यासह काही अटींची पूर्तता केल्यावर हे बटण मिळू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!