Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला मनसे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Kalyan Dombivli Elections : सध्या राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली संघटना मजबूत करण्यासाठी धडपड करत आहे. मात्र या राजकीय घडामोडींच्या काळात मनसेला अनपेक्षित धक्का बसला असून, कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मनसे सज्ज होत असतानाच जिल्हाध्यक्षांचा अचानक राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याचसोबत, प्रकाश भोईर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. रविवारी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार

एका मंचावरील उपस्थितीने वाढवली चर्चा

गेल्या आठवड्यात आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर दिसले होते. त्या घटनेनंतरच भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाबाबतचे राजकीय समीकरण बळकट व्हायला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनीही “लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणताना दिसतील,” असे संकेत देणारे वक्तव्य केले होते. माध्यमांनी विचारले असता भोईर यांनी ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेऊ’ असे सांगितले होते.

भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता

आज जिल्हाध्यक्षपदाचा औपचारिक राजीनामा दिल्यानंतर भोईर यांच्याकडून भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ते प्रवेश करताच भाजपला निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, मनसेला या घडामोडीचा फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!