Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhiwandi: भाजप आमदार महेश चौघुले आणि माजी महापौर विलास पाटील गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव, Video

Bhiwandi: भाजप आमदार महेश चौघुले आणि माजी महापौर विलास पाटील गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव, Video

Bhiwandi: भाजपाचे आमदार महेश चौघुले व माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. विलास पाटील समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे.

पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, मात्र परीसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये वाद काय?

महापालिका निवडणुकीत प्रभाग एकमध्ये भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले हा आणि माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते. पाटील यांनी चौघुले यांचा पराभव केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे घटना घडल्या होत्या.

असे काय घडले की वाद वाढला?

रविवारी सायंकाळी उशीरा विलास पाटील आपल्या मतदारांचे आभार मानत असतानाच भाजपा आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला.या हल्ल्याची माहिती विलास पाटील यांना समजताच विलास पाटील व त्यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून आमदार चौघुले समर्थकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!