Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather Update: राज्यात वरूणराजाची हजेरी! 21जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’; पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

Maharashtra Weather Update: राज्यात वरूणराजाची हजेरी! 21जिल्ह्यांत पावसाचा ‘यलो अलर्ट’; पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी सायंकाळी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा पावसाचा जोर पुढील ४८ तास कायम राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणेकरांची सायंकाळ झाली सुखद
पुणे शहरात बुधवारी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड होती, मात्र सायंकाळी पाच वाजेनंतर निसर्गाने कूस बदलली. अचानक आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पुणे स्टेशन, येरवडा, कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता या परिसरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाल्याने पुणेकरांना उकाड्यापासून सुटका मिळाली. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात कुठे गारपीट, तर कुठे पावसाचा इशारा
पावसाचे हे सावट केवळ पुण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या इतर भागांतही त्याचा प्रभाव जाणवत आहे. विदर्भातील गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे, तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

प्रशासनाकडून ‘यलो अलर्ट’ आणि सावधानतेचा इशारा
हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. विजा चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नका आणि सुरक्षित ठिकाणी राहा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!