Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Flood: पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये मोठा बदल; दुधाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसाठी मदतीची रक्कम ठरली

Maharashtra Flood: पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये मोठा बदल; दुधाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसाठी मदतीची रक्कम ठरली

Maharashtra Flood: राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या मदतीमध्ये आता महत्त्वाचे बदल करून त्याची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. या मदतीमध्ये टाकण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जे पशुपालक शेतकरी या मदतीमधून आधी वगळण्यात आले होते त्यांनाही मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मृत झालेल्या जनावरांसाठी आणि गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

नियमात केले हे महत्त्वाचे बदल
– अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील.
– प्रत्येक पशुपालकांना कमाल 3 मोठ्या दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
– प्रत्येक पशुपालकांना कमाल 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
– प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
– प्रत्येक पशुपालकांना कमाल 100 कुक्कुट पक्षांसाठी 10 हजार रुपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.

पशुपालकांना अशी मिळेल मदत
– पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3 हजार रुपये मिळणार.

– मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार 500 रुपये जाहीर.

– ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32 हजार रुपये मिळणार.

– मृत पावलेल्या हान जनावरांसाठी 20 हजार रुपयांची घोषणा.

– प्रति शेळी आणि मेंढीसाठी 4 हजार रुपयांची मदत जाहीर.

– कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये देणार.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!