Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा; निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढवण्याची तयारी

अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा; निवृत्तीचे वय ६५ वर्षांपर्यंत वाढवण्याची तयारी

Anganwadi Sevika : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट सेविका म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यासाठी शासन पावले उचलत असल्याची माहिती दिली.

मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा प्रस्ताव प्रक्रियेत.
बालकांना अधिक पोषक आहार मिळावा यासाठी आहार दरवाढीबाबत शासन सकारात्मक.
कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसंदर्भात प्रस्ताव सादर.
प्रोत्साहन भत्ता आणि केंद्र सरकारकडील थकीत मानधन देण्याची प्रक्रिया सुरू.
महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव.
अंगणवाडी केंद्रांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही.

सेविकांसाठी काय बदलणार?

निवृत्तीचे वय ६५ वर्षे झाल्यास अनुभवी सेविकांना आणखी पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सातत्य राहण्यास मदत होईल आणि अंगणवाडी व्यवस्थेलाही अनुभवी मनुष्यबळाचा फायदा होईल.

याशिवाय आहार दरवाढ, ग्रॅज्युएटी, मानधन आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याने राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!