Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MLC Election : भाजपचा पहिला उमेदवार जाहीर; राणा दाम्पत्याचा विरोध डावलत प्रवीण पोटेंना संधी

MLC Election : भाजपचा पहिला उमेदवार जाहीर; राणा दाम्पत्याचा विरोध डावलत प्रवीण पोटेंना संधी

MLC Election : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी (ता.२९) ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या उमेदवारीवरून भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. प्रवीण पोटे यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर असले तरी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला होता. खासदार नवनीत राणा यांनीदेखील पोटेंच्या नावाला विरोध दर्शवत भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता.

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रवीण पोटे यांनी आपल्याविरोधात काम केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पोटे प्रचारात सक्रिय झाले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत दगाफटका झाल्यामुळेच पराभव झाल्याचा दावा राणा दाम्पत्याकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळेच पोटे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा रंगली होती.

अखेर भाजप नेतृत्वाने प्रवीण पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बावनकुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून असल्याने पुढील एक-दोन दिवसांत काँग्रेसला निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे रवी राणा यांनीही या निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ते अखेरपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!