Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे तेलाच्या किमती वाढल्या, कच्च्या तेलाच्या किमती १०५ डॉलरच्या पार

नवी दिल्ली : सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. हे युद्ध लवकर थांबावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धावर बोलताना आम्ही इराणला कधीही अणुशक्ती बनू देणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही. आम्ही दोन ते तीन आठवड्यांत मोठी कारवाई करणार आहोत. अमेरिकी सैन्य आपले ध्येय साध्य करण्याच्या अगदी जवळ आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली जाईल. जे लोक त्या मार्गाने तेल आयात करतात त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी पुढे यावे. अमेरिका त्यांना पाठिंबा देईल. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. जागतिक कच्च्या तेलाची किंमत १०६ डॉलरच्या वर गेली, तर आदल्या दिवशी ब्रेंट क्रूड तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरली होती. मात्र, आज त्यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेल ५% नी वाढून १०६.२२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. बेंचमार्क अमेरिकी क्रूड तेल ४.२% नी वाढून १०४.३६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. भारताच्या अडचणीही वाढल्या. ट्रम्प यांच्या भाषणामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!