नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कॅलेंडरनुसार मे 2026 मध्ये बँकांना एकूण १३ दिवस सुट्ट्या असतील. आठवड्याची सुट्टी तसेच अन्य सण, उत्सव, महापुरुषांची जयंती यामुळे मे महिन्यात एकूण १३ सुट्ट्या असतील. त्यामुळेच या १३ दिवसांच्या सुट्ट्या लक्षात घेऊनच बँकेशी संबंधित कामांचे नियोजन करावे.
मे महिन्यात बँका १, ३, ९, १०, १६, १७, २३,२४, २६, २७, २८ तसेच ३१ मे रोजी बंद असतील. १ मे नंतर ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल. १६ मे रोजी सिक्कीम, २६ मे रोजी त्रिपुरा येथे बँका बंद असतील. २७ मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडू, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, गोवा आणि बिहार वगळता इतर संपूर्ण देशात बँक बंद असेल. २८ मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडू, जम्मू-कश्मीर, राजस्थान, गोवा, बिहार येथे बँक बंद असेल.
याशिवाय ३, १०, १७, २४ आणि ३१ मे रोजी रविवार आहे. ९ आणि २३ मे रोजी दुसरा आणि चौथा रविवार असल्याने या दिवशीही बँका बंद असतील. दरम्यान, या दिवशी बँका बंद असल्या तरीही नेट बँकिग, मोबाईल बँकिंगचे सर्व व्यवहार सुरुच असतील.


