मुंबई : ‘नागिन’ या शो ला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे आत्तापर्यंत याचे 7 सीजन आले आहेत. मात्र, आता प्रेक्षक गेल्या तीन वर्षांपासून ‘नागिन ७’ ची वाट पाहत होते. लोक शोच्या प्रीमियरचीही आतुरतेने वाट पाहत होते. शोच्या प्रीमियरसाठी २५ डिसेंबर, २०२५ ही शुभ तारीख ठरली होती. त्यानुसार हा शो आला देखील. मात्र, आता त्याची लोकप्रियता घटत आहे.
जेव्हा शो सुरू होणार होता, तेव्हा ‘नागिन’च्या प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेव्हा नागिनचे टीव्हीवर शाही थाटात स्वागत करण्यात आले होते. शोच्या पहिल्या एपिसोडला गगनाला भिडणारे टीआरपी मिळाले होते. दोन महिने या शोचे खूप कौतुक झाले. यानंतर एकता कपूरला एआयची (AI) आवड निर्माण झाली. व्हीएफएक्सवर (VFX) पैसे खर्च करण्याऐवजी, त्यांनी एआयचा वापर करून एक स्वस्त आणि दर्जेदार शो बनवण्याची योजना आखली.
पण आता सासू-सून मालिकांचे प्रेक्षक अधिक हुशार झाले आहेत. एकता यांच्या कदाचित हे लक्षात आले नसेल की, आता आपले ‘जनरेशन झेड’चे (Gen Z) फॉलोअर्ससुद्धा हा शो पाहत आहेत. एआय वापरल्याबद्दल एकता यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण या ट्रोलिंगचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. एकता कपूर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांच्याकडे शोसाठी मोठे बजेट नाही. जेव्हा ‘नागिन ७’ टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० मधून बाहेर पडला, तेव्हा बजेट आणि एआयवर चर्चा सुरू झाली होती.


