पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे सरव्यवस्थापक / उप. सरव्यवस्थापक /सह. सरव्यवस्थापक (ऑडिट/कम्प्लायंस/अर्कोटस/वसूली), शाखाप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (आय.टी. विभाग), आयटी प्रशिक्षणार्थी, लिपीक, ड्रायव्हर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वाशिम येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सरव्यवस्थापक / उप. सरव्यवस्थापक /सह. सरव्यवस्थापक (ऑडिट/कम्प्लायंस/अर्कोटस/वसूली), शाखाप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (आय.टी. विभाग), आयटी प्रशिक्षणार्थी, लिपीक, ड्रायव्हर.
– एकूण रिक्त पदे : 13 पदे.
– नोकरीचे ठिकाण : वाशिम.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2026.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : wucbl@washimbank.com
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि: वाशिम, मुख्य कार्यालय स्व. रामकृष्णजी राठी मार्ग, रविवार बाजार, वाशिम ४४४ ५०५ (महाराष्ट्र)
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.washimbank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


