Maharashtra Strike : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संपाचा इशारा दिला असून २१ एप्रिलपासून तब्बल १७ लाख कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने कर्मचारी संघटनांनी हा कठोर पवित्रा घेतला आहे.
या संपाचा थेट परिणाम सरकारी कार्यालयांपासून शिक्षण आणि आरोग्य सेवांपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. मंत्रालयीन कामकाज, शाळा-महाविद्यालये आणि रुग्णालयांतील सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकतात.
तुमच्यावर काय परिणाम होणार?
- सरकारी कामे (दाखले, परवाने, कागदपत्रे) प्रलंबित राहू शकतात
- शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापनावर परिणाम
- सरकारी रुग्णालयांतील सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
- विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी उशिरा होऊ शकते
कर्मचारी संघटनांनी सरकारला अंतिम इशारा दिला असून, चर्चा निष्फळ ठरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


