Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Delhi Terror Plot : मोठा दहशतवादी कट उधळला! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याची तयारी; महाराष्ट्रासह तीन राज्यांतून 4 जण अटकेत

Delhi Terror Plot : मोठा दहशतवादी कट उधळला! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याची तयारी; महाराष्ट्रासह तीन राज्यांतून 4 जण अटकेत

Delhi Terror Plot : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कटामुळे हादरली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी(Special Cell) वेळीच कारवाई करत टॉय कारमध्ये IED ठेवून साखळी स्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रासह तीन राज्यांतून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, शेख इमरान आणि मोहम्मद सोहेल यांचा समावेश आहे. हे चौघेही सोशल मीडियावरील ग्रुप्सद्वारे संपर्कात होते आणि सामान्य कामगार म्हणून वावरत होते. कोणी ऑटो मेकॅनिक, तर कोणी प्लंबर किंवा सुरक्षा रक्षक.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींच्या निशाण्यावर लाल किल्ला, इंडिया गेट, तसेच राम मंदिर, भारतीय संसद आणि लष्करी ठिकाणे होती. त्यांनी या ठिकाणांची रेकी केल्याचेही उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने IED स्फोटक तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्यांच्या ताब्यातून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, खिळे आणि रिमोट कंट्रोल कार जप्त करण्यात आली आहे.

हा कट ‘गजवा-ए-हिंद’ या कट्टरपंथी विचारसरणीतून प्रेरित असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि महाराष्ट्र, बिहार व ओडिशामध्ये एकाच वेळी कारवाई करत चौघांना अटक केली.

सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!