Pune Crime News : पुणे शहरात धक्कादायक गुन्ह्याची घटना उघडकीस आली आहे. भिडे पुल परिसरातील नदीपात्रात एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करतानाच डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची नाकाबंदी करत तपास सुरू केला. अद्याप मृत तरुणाची ओळख पटलेली नसून, त्याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की इतर कोणत्या कारणातून, याचा शोध पोलीस घेत आहेत.


