Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sangli Crime: सांगलीत खळबळ! पत्नीच्या प्रेमासाठी मुलाने जन्मदात्रीला संपवलं; धक्कादायक कृत्याने मिरज तालुका सुन्न

Sangli Crime: सांगलीत खळबळ! पत्नीच्या प्रेमासाठी मुलाने जन्मदात्रीला संपवलं; धक्कादायक कृत्याने मिरज तालुका सुन्न

Sangli Crime: ज्या हातांनी चालायला शिकले, त्याच हातांनी जन्मदात्रीचा श्वास रोखल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगलीतील मानमोडी (ता. मिरज) येथे घडली आहे. घरातील किरकोळ वाद आणि पत्नीला घरात घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झाले. आईचे तोंड दाबून पोटच्या मुलानेच तिचा खून केल्याचे समोर आले असून, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

आईचा विरोध ठरला मृत्यूला निमंत्रण
मयत संगीता जीवन झेंडे (५१) आणि त्यांचा मुलगा जगदीश जीवन झेंडे हे मानमोडी येथे एकत्र राहत होते. जगदीशची पत्नी सोनाली हिच्याशी त्याचे पटत नसल्याने किंवा इतर कौटुंबिक कारणांमुळे ती माहेरी राहत होती. जगदीशला आपल्या पत्नीला पुन्हा घरी आणायचे होते, मात्र आई संगीता यांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता. पत्नीला घरात स्थान देण्यावरून माय-लेकात गेल्या अनेक दिवसांपासून ठिणगी पडली होती.

मध्यरात्री काळजाचा थरार
बुधवारी मध्यरात्री याच विषयावरून घरात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात जगदीशचे भान सुटले. पत्नीच्या ओढीपोटी त्याने आईच्या नाका-तोंडावर दाब देऊन तिचा श्वास कोंडला. प्रतिकार करण्याची संधी मिळण्यापूर्वीच संगीता यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसी खाक्या दाखवताच मुलाची कबुली
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आनंदराव घाडगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनीही तपासाच्या सूचना दिल्या. सुरुवातीला संशयित जगदीश पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी सखोल चौकशी आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!