Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खड्ड्याने हिरावला कुटुंबाचा आधार! बैलगाडी उलटून 28 वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत; जामखेड तालुक्यातील घटना

खड्ड्याने हिरावला कुटुंबाचा आधार! बैलगाडी उलटून 28  वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत; जामखेड तालुक्यातील घटना

Bullock Cart Accident: रस्त्यावरील खड्ड्यामुळे बैलगाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील बांधखडक परिसरात घडली आहे. गणेश मधुकर चव्हाण (वय २८) असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव असून, या अपघातामुळे चव्हाण वस्तीसह संपूर्ण खर्डा परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गणेश आपल्या चुलत्यांसोबत शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन बैलगाडीने घराकडे परतत होता. खैरी नदीजवळील रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात बैलगाडीचे चाक आदळले. या धक्क्यामुळे बैलगाडीचा तोल जाऊन ती अचानक उलटली. दुर्दैवाने गणेश या गाडीखाली गाडला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

उपचारापूर्वीच संपली प्राणज्योत
अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत गणेशला उपचारासाठी खर्डा येथील रुग्णालयात नेले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात येत होते. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्याचे चुलते बाळू चव्हाण हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खर्डा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मदत देण्याची नातेवाईकांची मागणी
गणेश हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. त्याच्या निधनाने वडील आणि दोन भावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’ योजनेअंतर्गत या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!