Panchwati Conversion Case: नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण आता अधिक गडद होत चालले आहे. पंचवटी भागात एका तरुणीने दिलेल्या धक्कादायक तक्रारीनंतर या प्रकरणातील ‘मोडस ऑपरेंडी’ उघड झाली आहे. बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी तरुणीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तंजीर इनामदार या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गळ्यात तुळशीमाळ काढली आणि ‘लव्ह बाईट’चे फोटो
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या धर्माच्या भावना दुखावण्यासाठी गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील संरक्षणाचे धागे तोडून फेकले. इतकेच नाही तर, एका विशिष्ट धर्माच्या रीतीरिवाजांचे पालन करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेऊन त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले आणि ते ‘लव्ह बाईट’ असल्याचे सांगत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याच धमक्यांच्या आधारे तिला विविध लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
व्यसनाधीन करून मानसिक दबाव
तपासात असे समोर आले आहे की, पीडित मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिला बळजबरीने सिगारेट आणि दारू पाजण्यात आली. हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद बोलून आणि कुटुंबाच्या जिवाचे भय दाखवून तिचे ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा केवळ एक गुन्हा नसून, मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे टप्प्याटप्प्याने धर्मांतर घडवून आणण्याचा एक मोठा कट असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.
‘गोपाळ’चा ‘गुलशन’ झाला; व्हिडिओतून पुरावा समोर
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तौसिफ अत्तार याचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये गोपाळ नावाच्या एका व्यक्तीचे नाव बदलून त्याचे ‘गुलशन’ असे नामकरण करतानाचा धार्मिक विधी दिसत आहे. धर्मांतराच्या या प्रक्रियेत पीडितांना हळूहळू मूळ धर्मापासून तोडून विशिष्ट विचारांच्या आहारी नेले जात होते.
पोलिसांकडून कसून तपास
पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तंजीर इनामदार पोलिसांच्या कोठडीत आहे. अशाच पद्धतीने इतरही काही मुलींची फसवणूक झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.


