Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pandharpur Heatstroke Death: उन्हाचा कहर! पंढरपुरात 24 वर्षीय तरुणाचा करुण अंत; पत्र्याचं घर ठरलं काळ?

Pandharpur Heatstroke Death: उन्हाचा कहर! पंढरपुरात 24 वर्षीय तरुणाचा करुण अंत; पत्र्याचं घर ठरलं काळ?

Pandharpur Heatstroke Death: महाराष्ट्रात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केली आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका बसून राज्यात उष्माघाताचे बळी जाण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा, तर लातूरच्या निलंगा तालुक्यात एका 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या तापमानाने प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

पत्र्याच्या शेडमधील प्रचंड उष्णता ठरली जीवघेणी
पंढरपुरातील दिनेश प्रकाश देशमुख (24) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असून नुकतीच उघडकीस आली आहे. दिनेश दुपारी भर उन्हातून घरी परतला होता, मात्र त्याचे घर पत्र्याचे असल्याने आतील तापमान प्रचंड वाढले होते. या उष्णतेमुळे त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. सोलापूर जिल्ह्यात सध्या तापमान 44 अंशांच्या पार गेले असून, पंढरपुरात सकाळी 10 वाजल्यापासूनच अंगाची लाहीलाही होत आहे.

शेतात चारा कापताना ज्येष्ठ शेतकऱ्यावर काळाचा घाला
लातूरच्या पानचिंचोली (ता. निलंगा) येथील त्र्यंबक नारायण बेळंबे (75) या ज्येष्ठ शेतकऱ्याचाही उन्हाच्या तडाख्याने बळी गेला आहे. दुपारी 12:30 च्या सुमारास त्र्यंबक हे स्वतःच्या शेतात जनावरांसाठी चारा कापण्याचे काम करत होते. कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा संशय असलेल्या मृतांचा आकडा आता 4 वर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाकडून ‘अ‍ॅडव्हायजरी’ जारी; सावधानतेचा इशारा
वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाने नागरिकांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, उन्हात काम करताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूरमध्ये उन्हामुळे कार जळण्याच्या घटनांनंतर आता मानवी बळी गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!