Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Mayor Accident : महापौर रितू तावडे यांच्या ताफ्याला अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

Mumbai Mayor Accident : महापौर रितू तावडे यांच्या ताफ्याला अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सोमवारी सायन पुलावर अपघात झाला. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडला. या घटनेत ताफ्यातील तीन वाहने एकमेकांवर आदळली.

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर रितु तावडे या एका शासकीय कार्यक्रमासाठी जात असताना सायन पुलावर त्यांच्या ताफ्यासमोर एक दुचाकीस्वार आला. त्याला धडक लागू नये म्हणून पुढील एस्कॉर्ट वाहनाच्या चालकाने तातडीने ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महापौरांची गाडी आणि त्यामागील सुरक्षा वाहन एकमेकांवर आदळली.

सुदैवाने या अपघातात महापौर रितु तावडे, सुरक्षा रक्षक किंवा चालकांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची नोंद केली. त्यानंतर महापौरांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. खराब झालेली वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!